|| श्री रामकृष्ण सरस्वती महाराज ||

लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्‍टान्तीं दिसतों । 

भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं  ||  

गुरुचरित्र अध्याय ५१, श्लोक ३४


परमपूज्य सद्गुरु.श्री रामकृष्ण स्वामी महाराज हे भगवान शिवा पासून चालत आलेल्या थोर गुरुपरंपरेतील सद्गुरु आहेत. सद्गुरूंचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८५५ (१६ फेब्रुवारी १९३४ ) रोजी नगर जिल्ह्यातील रायतळे गावी झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि त्रिकाळज्ञान झाले. आपल्या जीवन कार्याची त्यांना कल्पना आली.त्यानंतर काही दिवसातच त्या त्यांना.श्री दत्तात्रेयांनी गाणगापूर येथे स्वामी नृसिंहसरस्वती  सरस्वतीच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला आणि साधना करण्यास सांगितले. २५ वर्ष कठोर तपश्चर्या झाल्यानंतर श्रीमद् नृसिंहसरस्वती स्वामींनी पुन्हा दर्शन दिले व वेदविद्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य त्यांच्यावर सोपविले.


येथून पुढे सद्गुरूंचे अवतार कार्य सुरू झाले व त्यांनी लोकांना दर्शन देण्यास सुरुवात केली. त्यांच्या दर्शनातून सामान्य जीवनाचा उद्धार होऊ लागला. “दर्शनें दोष नासती”, “दर्शनमात्रे मन कामना पुरती” या उक्तीचा अनुभव येऊ लागला आणि त्यातून वेद संरक्षण संवर्धनाचे कार्य आकार घेऊ लागले.


सद्गुरुंनी सर्व कार्य शिष्यांच्या मार्फत भिक्षेच्या माध्यमातून उभे केले आहे. रामदास स्वामींच्या प्रमाणे आपल्या शिष्यांना घरोघरी जाऊन भिक्षा मागण्यास सांगितली. त्याप्रमाणे सद्गुरूनी भक्तांना घरोघरी जाऊन धर्मासाठी व वेद कार्यासाठी भिक्षा मागण्या सांगितली. त्यासाठी त्यांनी गावोगावी सत्संग मंडळे स्थापन केली.


सद्गुरूंच्या मुखातून ज्ञानगंगा अखंड वाहत असे. त्यातून अनेक गूढ गहन विषयांची उकल सद्गुरु अगदी साध्या सोप्या भाषेत करीत. त्यांच्या रसाळ मधुर वाणीतून प्रकटणारे अमृतबोल सामान्य माणसांना धर्माच्याचा मार्ग दाखवत आहेत. या ज्ञानभांडारातून ‘गुरुवाणी’,’अमृत कलश’, ‘धर्म दर्शन’ या सारख्या ग्रंथसंपदेची निर्मिती झाली आहे.


वेद कार्याबरोबरच नीतिमान समाज घडवण्याचं कार्य सद्गुरू आजही अव्याहतपणे करीत आहेत. सद्गुरूच्या नुसत्या दर्शनाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो नकळत सात्विक वृत्तीने वागू लागतो. नास्तिकांचा आस्तिक होतो. त्याला देव धर्माचे महत्त्व समजू लागते. तो आपोआप धर्म प्रवृत्त होतो.


यातूनच एक आध्यात्मिक चळवळ संपूर्ण भारत भर पसरत आहे, हे कार्य सद्गुरूच्या आध्यात्मिक शक्ती, कठोर तपश्चर्येतून, कडक ब्रह्मचर्यतून आणि प्रखर वैराग्यतून उभे राहिले आहे. देहरुपाने सद्गुरूंचे वास्तव्य आपल्याला दिसतात नसले तरी शक्तीरूपाने ते आजही वास करून आहेत.याची प्रचिती भक्तांना सदैव येते.